जेव्हा नवरा मुलीचा ग -ळा दाबायला गेला तेव्हा पहा आईने काय केले.. कथा पूर्णतः काल्पनिक आहे. त्याने तिला लग्ना साठी विचारले, आणि ती पूर्णपणे हुरळून गेली. का नाही जाणार.. असही घरच्या वातावरणाला कंटाळली होती ती. दारूडा बाप, वाया गेलेला भाऊ आणि या सगळ्याला कंटाळून आई ने स्वतः साठी शोधलेला मर्यादे बाहेरचा मार्ग.. या सगळ्याचा कंटाळा आला होता तिला. ती दिसायला तशी साधारण होती. चारचौघी सारखीच, तो अगदी रुबाबदार, देखणा.. कुठल्याही तरुणीला भुरळ पाडेल असा, तिलाही भुरळ पडली होती त्याची.. म्हणूनच फक्त बस स्टॉप. वरच्या दोन आठवड्यांच्या ओळखीत तिने त्याला होकार दिला.. तिच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा एक किरण बनून आला होता तो, तिने कुठला ही मागचा पुढचा विचार केला नाही.. बस आता तिला या दलदलीतून बाहेर यायचं होत. घरच्यांच्या परवानगीची गरज नाही भासली तिला. तिने फक्त त्यांना कळविले. तिच्या घरातला प्रत्येक जण स्वतःचा विश्वात एवढा रमला होता की तिच्या असण्या नसण्याने त्यांना काही फरकही पडला नाही. ती गेली निघून मंदिरात लग्न केले.. लग्नाच्या दुसऱ्याच रात्री तिला लक्षात आले, तिने किती मोठी चूक केली आहे ती.. ...
Posts
- Get link
- X
- Other Apps
लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा पतीने पत्नीला तिच्या चारित्र्य विषयी प्रश्न विचारला.. तेव्हा पहा पुढे काय घडले कथा पूर्णतः काल्पनिक आहे. पन्नाशीतली सुधा आजही दिसायला तितकीच रेखीव ,मोहक व सुंदर होती. तिची गहुवर्णीय नितळ त्वचा, सुडौल बांधा ,लांबसडक केस व कोणीही आकर्षित व्हावं असं तीच भारदस्त व्यक्तिमत्व ,सार काही बघत राहाण्यासारख होतं. ती जेंव्हा स्वतःला आरशात पाहत असे तेंव्हा लांबसडक काळ्या भोर केसातून डोकावणारे एखादं दोन चंदेरी केस. तिला तिच्या उतरत्या वयाची जाणीव करून देत असत, आणि मग सुरू होत असे आठवणींचा जीवघेणा प्रवास…. एखाद्या चित्रफितीप्रमाणे मेंदूच्या स्मृतिपटलावरून एक एक दृश्य पुढे पुढे सरकत जावी त्याप्रमाणे एक एक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळून जात असे. आईविना सरलेलं बालपण.., तारुण्य.., लग्न.., नवरा.., मुले.., व आतापर्यंतचा तिचा प्रवास.., काढलेल्या खस्ता सारं सार काही, पुन्हा नव्याने परिस्थिती आणि जबाबदाऱ्या माणसाला लहान वयातच प्रौढ बनवतात. सुधाचही असंच काहीस झालं. लहान वयातच आई गेल्यामुळे तिच्या संसाराची आणि लहान भावांची जबाबदारी सुधावर येऊन पडली. त्यामुळे बालपणा...
- Get link
- X
- Other Apps
लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी नवऱ्याने गिफ्ट म्हणून असे काही दिले की, ते पाहून मुलीच्या वडिलांना अटॅक आला.. मानसी , दिसायला अगदी सुरेख अन रेखीव, गोरी गोरी पान जरी नसली तरी रंगाने गहुवर्णीय पेक्षा उजळ, लांबसडक काळेभोर केस, सुडौल बांधा, तपकिरी पाणीदार डोळे, सरळ धारदार नाक, नाजूक जीवणी, कमळा सारखे कोमल आणि गुलाबी ओठ, अन त्या सुबक ओठांच्यावर एक बारीकसा तीळ, जणू कोणाची दृष्ट लागू नये म्हणून परमेश्वराने आधीच सोय करून ठेवली होती. त्यात भरीस भर म्हणून ती हसल्यावर काळजावर वार करण्यासाठी दोन्ही गालांवर लक्ष वेधून घेणाऱ्या खळ्या स्वार होत्याच . निसर्गाने इतकं भरभरून सौंदर्य दिल होतं की त्यापुढे कृत्रिम प्रसाधने सुद्धा फिकी पडतील. पण इतकं सगळं असूनही माणसाचं दुर्दैवापुढे काही चालत नाही हेच खरं, दर शनिवारी सकाळी सात वाजता मुंबई हुन डेक्कन क्वीन पकडायची आणि साधारण अकरा, सव्वा अकरा पर्यंत पुण्यात टच व्हायचं हा मानसीचा आता नित्यक्रम झाला होता. आज शनिवार, नेहमीप्रमाणे मानसी मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दक्खनच्या राणीत चढली, आज तिला तिच्या आवडीची खिडकी जवळची. रिझर्व्ह सीट मिळाली, तिने आपलं सामान...
- Get link
- X
- Other Apps
संसाराचा गाडा पुढे ढकलण्याचा नादात हिने अखेरचा श्वास घेतला, परंतु हिचा नवरा अजून…. नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. तर चला कथेला सुरवात करू रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करून सई झोपण्यासाठी बेडरूममध्ये आली.. रात्रीचे 12.15 झाले होते. मोबाईल हातात घेऊन दिवस भरचे मेसेज सरकवत राहिली. बाजूला समीर म्हणजेच सईचा नवरा मोबाईल घेऊन बसला होता. सई- “समीर उद्या सकाळी मला लवकर ऑफिसला जायच आहे,तर प्लीज मला सोडणार का स्टेशन ला..” समीर- “नाही हा सई माझी उद्या सुट्टी आहे. तर मी उद्या उशीरा उठणार आहे.. तु जा ना रिक्षा ने.. मला आराम करायचा आहे.” सई- “अरे पण सकाळी लवकर कुणी नसत, मला भीती वाटते एकटीला रिक्षा मध्ये. तु आलास तर बर होईल”. समीर- (जोरात ओरडून)” एकदा सांगून समजत नाही का तुला? माझा उद्या Week off आहे मला माझी झोप मोड करायची नाही.” आणि हो एवढीच भीती वाटते तर सोडून दे नोकरी आणि बस घरी. किती पगार मिळतो ते माहित आहे.. सई- गप्पच… मोबाईल मध्ये 4.00 चा गजर लावून झोपी गेली.. सकाळ झाली गजर च्या आवाजात सुद्धा समीर भडकला.. सई काहीही न बोलता गजर बंद करून उठली. घरातील कचरा काढ...
- Get link
- X
- Other Apps
मुलगा परदेशात त्याच्याकडे भरपूर पैसे असून देखील, पहा या आई वडिलांची अवस्था कशी झाली.. royalmarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. या कथेचे संपूर्ण श्रेय लेखक श्री. किरण कृष्णा बोरकर यांना जाते. तर चला कथेला सुरवात करू, “काही आणायचे आहे का मॅडम..? मी खाली उतरतोय….” त्याने कापडी पिशवी हातात घेत कोपऱ्यातील चपला पायात घालत विचारले. “आता कशाला जाताय खाली.? माहितीय ना काय चालू आहे…? उगाच रोगाला आमंत्रण..” तिने त्रासून म्हटले. “मग काय करू मॅडम….?? काल पासून दूध नाही. साखर तर कमी लागते आपल्याला त्यामुळे त्याचे टेन्शन नाही. डायबेटीस असल्याचा काय फायदा असतो हे या रोगाने जाणवून दिले आपल्याला..” तो हसत म्हणाला. “होईल हो सर्व काही व्यवस्थित…. आजचा दिवस दुधाची पावडर वापरू.. उद्या कोरा चहा पिऊ.. तोपर्यंत काहीतरी होईल….” ती म्हणाली. “हो ना…जुने दिवस आठवले बघ .. तेव्हा दुधाच्या बाटल्या मिळायच्या केंद्रावर . आपली तर ऐपत नव्हती . मग जाधवांकडून एक रुपयांचे दूध आणून चहा करायचो . आणि एक रुपयाचा बिस्कीटचा पुडा आणून पोराला द्यायचो.दूध त्यांच्य...
- Get link
- X
- Other Apps
जेव्हा पत्नीच्या मित्राबद्दल पातीला कळते तेव्हा पती तिच्या सोबत असे वागतो की, जाणून तुम्हाला धक्काच बसेल. सकाळी सगळे कामावर निघून गेल्यावर. ऋता ने पोह्याची डिश पुढे घेतली. खरं तर गार पोहे तिला अजिबात आवडत नव्हते. पण आज खूपच घाई झाली. पट्टकन खायला जमलेच नाही. खूपचं उलटसुलट काम करावे लागले आज. स्वतःशीच म्हणाली, माझचं मेलीच चुकलं. माहित होत घरात भाज्या नाही, पण कंटाळा केला. त्याची शिक्षा पण भोगायलाच पाहिजे नं. घरात थोड्या थोड्या भाज्या होत्या. त्यात एकाला एक आवडते तर, दुसऱ्याला दुसरीच. मग काय घातला तीन भाज्यांचा घाट. डबा पाहून आज प्रत्येक जण मात्र सुखावणार हे नक्की. प्रत्येकाच्या आवडीची भाजी डब्यात ! तरी हे म्हणाले ऋता अग नको देऊस आजच्या दिवस डबा , निदान मला तरी. खाईन मी बाहेर. नाही तर असं कर, तू मला फक्त पोळ्या बांधून दे. भाजी घेईन मी कॅन्टीग मधून. काही नको अहो करते पटपट. मग म्हणाले तू भाजी टाकते फोडणीला तोवर मी तुला पोहे भरवतो . एक घास तू , एक घास मी. तुझे दोन्ही काम होतील. तसेही गार पोहे तुला आवडत नाही ना..! काहीतरीच काय हो तुमचं ? थोडी लाज ! शरम…! पोरं मोठी झाली आपली. अन त...
- Get link
- X
- Other Apps
पत्नीने वयाच्या पंचावन्नव्या वाढदिवशी पतिकडे असे काही गिफ्ट माघीतले की ते ऐकून पतीला. पंचवन्नाव्या वाढदिवशी तिच्या पतीने तिला विचारलं, “बोला राणी सरकार काय हवंय वाढदिवशी”. “मंद स्मित करून ती म्हणाली,” जाऊ द्या तुम्ही नाही देऊ शकणार. डायरेक्ट कुवतीवर संशय घेतल्यावर पतीदेव हादरलेच, “नाही आता तर तुला मागावंच लागेल.” “बरं ठीक आहे, द्या मला मॅरीड बॅचलर लाईफ” ती अगदी शांतपणे म्हणाली, म्हणजे? तुला काय मी डांबून ठेवलंय आणि. मारतोय, झोडतोय, काही कमी केलंय? काहीसं चिडूनच त्याने विचारल. “फक्त हीच कारणे हवीत का ओ स्वतंत्र आयुष्य जगायला, आपलं आयुष्य आपल्यासाठी, आपल्या मनासारखं, जगावं हे एक कारण पुरेसं नाही का?, रात्री झोपताना सकाळी डबा काय करायचा अन सकाळी डबा करताना आता नाश्ता काय करायचा, ऑफिस ला जायची लगबग अन ट्रेन मध्ये डोक्यात ऑफिसची पेंडिंग कामे, घरी येताना रात्री जेवायला भाजी काय करू, मुलांचं शिक्षण, अभ्यास, नोकरी, तुमची चिडचिड, तुमचं काम, तुमची सगळ्यांची आजारपणे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, यात माझी मी हरवून गेलीय, तुम्ही ऑफिस वरून घरी आल्यावर. मोबाईल मध्ये, तोंड खुपसून. कधी तरी कामाव्यतिरिक्...