पत्नीने वयाच्या पंचावन्नव्या वाढदिवशी पतिकडे असे काही गिफ्ट माघीतले की ते ऐकून पतीला.
पंचवन्नाव्या वाढदिवशी तिच्या पतीने तिला विचारलं, “बोला राणी सरकार काय हवंय वाढदिवशी”. “मंद स्मित करून ती म्हणाली,” जाऊ द्या तुम्ही नाही देऊ शकणार. डायरेक्ट कुवतीवर संशय घेतल्यावर पतीदेव हादरलेच, “नाही आता तर तुला मागावंच लागेल.” “बरं ठीक आहे, द्या मला मॅरीड बॅचलर लाईफ” ती अगदी शांतपणे म्हणाली, म्हणजे? तुला काय मी डांबून ठेवलंय आणि.
मारतोय, झोडतोय, काही कमी केलंय? काहीसं चिडूनच त्याने विचारल. “फक्त हीच कारणे हवीत का ओ स्वतंत्र आयुष्य जगायला, आपलं आयुष्य आपल्यासाठी, आपल्या मनासारखं, जगावं हे एक कारण पुरेसं नाही का?, रात्री झोपताना सकाळी डबा काय करायचा अन सकाळी डबा करताना आता नाश्ता काय करायचा, ऑफिस ला जायची लगबग अन ट्रेन मध्ये डोक्यात ऑफिसची पेंडिंग कामे, घरी येताना रात्री जेवायला भाजी काय करू, मुलांचं शिक्षण, अभ्यास, नोकरी, तुमची चिडचिड, तुमचं काम, तुमची सगळ्यांची आजारपणे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, यात माझी मी हरवून गेलीय, तुम्ही ऑफिस वरून घरी आल्यावर.
मोबाईल मध्ये, तोंड खुपसून. कधी तरी कामाव्यतिरिक्त चार शब्द बोललात का मला?, कामात मदत तर सोडाच पण कधी पाहिलत का की सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मी काय करत असते. ऑफिस मधून घरी आल्यावर तुमची स्पेस तुम्ही घेतली ना कायम, तुमच्या वेळेत झोपला, तुमच्या वेळेत उठलात . आता तुम्ही रिटायर झालात आता मलाही रिटायर करा. तुम्हाला हवं तस आयुष्य जगताय ना मग मलाही जरा मनासारखं जगू द्या. नाहीतरी तुम्हाला काय लागत माझ्याकडून दोन वेळचं जेवण, दोन वेळ चहा, एक वेळ नाश्ता, सुना आल्यात, तेवढं तर करतीलच सासऱ्यासाठी,” हो की नाही ग सुनेकडे.
पहात ती म्हणाली. “अग पण तू एकटी करणार काय?, कुठे जाणार आहेस?, कुठे राहणार आहेस ?”, “माझा सगळा विचार करून झालाय, मुले ही व्यवस्थित कमवतात, आपल्या दुसऱ्या फ्लॅट मध्ये भाडेकरू आहेत. थोड्या दिवसात त्यांचं ऍग्रिमेंट संपेल मी तिथे जाऊन राहीन. बँकेत पैसे आहेत , त्याच्या व्याजावर भागेल माझं.” पण अग..! लोक काय म्हणतील?, आता मात्र तिला खुदकन हसू आलं, लोकं? ती कधी काय नाही म्हणत, त्यांचं कामच आहे बोलायचं, तुम्ही नाही का उठसुठ लोकांना नावे ठेवत. पण ते त्यांना करायचं तेच करतात ना?. नुसते घरातच नाही तर जगात सुद्धा असे अनेक लोक आहेत ज्यांना.
स्वतः पेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय याची पर्वा असते. अहो तुमच्या सारखेच काळजीवाहू आहेत ते, समोरचा माणूस जास्त सुखात दिसला की त्यांना प्रश पडतो. हा एवढा कसा सुखी आणि जास्त दुःखात दिसला तरी प्रश्न पडतो इतकं असूनही हा इतका कसा दुःखी?, गरीबाला तुच्छ समजायचं आणि श्रीमंताला घमेंडी, मला लोकांची कारणे देऊ नका. इतकी वर्ष तुम्हाला विचारून सगळं केलंय आता हे सुद्धा तुमच्या मर्जीनेच करेन. नेमकं काय करणार आहेस तिथे राहून?. पाहिजे तेंव्हा झोपेन, पाहिजे तेंव्हा उठेन, कधीही काहीही बनवून खाईन कधी वाटलं की छान आवडीचे कपडे घालून एखादा मूव्ही बघायचा.
तर जाऊन पाहीन, मॉल मध्ये जाऊन विंडोशॉपिंग करीन, कधी एखाद्या उच डोंगरावर जाऊन पहाटेचा उगवता सूर्य पाहीन. तर कधी क्षितिजावर मावळती संध्याकाळ डोळ्यात साठवीन, कधी लहान मुलांच्या बागेत जाऊन त्यांना बागडताना पाहीन, बाहेर पाऊस पडत असेल तर मुद्दाम छत्री न घेता जाईन आणि चिम्ब भिजून घेईन बाहेरून अन आतूनही, तासंतास शांत, निवांत एखाद्या देवळाच्या पायरीवर बसेन. कधी समुद्राला डोळ्यात साठवून घेईन तर कधी फुलांचा सुगंध हृदयात भरेन, आवडत्या लोकांना भेटीन मित्र मैत्रिणींशी भरपूर गप्पा मारेन कारण त्यावेळी तू माझ्या बोलण्या कडे, आणि फोनकडे नजर रोखून.
मी कधी फोन खाली ठेवते याची वाट पाहत नसशील, तुझी जेवायची वेळ झाल्यावर माझ्या छातीत, तुझ्या भुकेची धडधड नाही सुरू होणार, कधी एखादं नाटक पहावस वाटलं तर एकटी पूर्ण बकेटभर मिक्स पॉपकॉर्न खात एन्जॉय करीन, कुठे फिरायला गेली आणि एखादं ठिकाण जास्त आवडलं तर थोडा जास्त वेळ बसेन, त्यावेळी तुझ चल लवकर उशीर होतोय, हे टूमणं लागलेल नसेल. कधी मध्यरात्री लिखाण करावंसं वाटलं तर मस्त गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत, मनातलं सगळं वेळीच लिहून काढेन. अरे वा..! तू लिहिणार? काय कविता की लेख?. अचानक लेखिका कुठून जन्माला आली, तो कुत्सित पणे.
म्हणाला. तू कधी वाचलंस मला? तीने रोखुन विचारलं, अग..! पण हे सगळं तू माझ्या सोबतही करू शकते. त्याने विषय फिरवला….! खरंच? अर्ध आयुष्य संपल्यावर?. आता जेंव्हा मी तुला आहे तसा मान्य केल्यावर? आता तू माझ्या सोबत हे सगळं करणार?. जे एवढ्या आयुष्यात नाही घडलं ते चार दिवसात घडेल?. जगतो आहेस ना मनासारखा, तुला आवडेल तसा, आले का तुझ्या कोणत्या गोष्टीत मध्ये?, जे स्वतःला हवं तेच केलंस ना, मग आता मला करू दे की माझ्या मनासारख, बघ माझं वय काय झालंय, आता तरी विश्वास ठेव, तू मला बेड्या नाही घातल्यास, फक्त पंखांना दगड बांधून उडायची परवानगी दिलीस.
आता माझं वय झालंय ते दगड झेपत नाहीत मला, ते ओझं तुझ्याच हातानी कमी कर बास इतकंच हवंय, मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
Comments
Post a Comment