तु माझी झालीस I Intense Love I प्रेम कविता Posted on March 21, 2018 by drsubhash27 रोज होतीस भेटत पण तेंव्हा वेगळी वाटलीस कळलं नाही मला तू कधी माझी झालीस सुर्यास्त पहाण्याचा तुला होता छंद माझ्या निर्मळ प्रेमाचा नव्हता तुला गंध त्या संध्याकाळी तू खुप वेळ थांबलीस बोलता बोलता अचानक थोडी तू अडखळलीस कळलं नाही मला तू कधी माझी झालीस मावळत्या प्रकाशात चेहऱ्यावर तुझ्या लाली अंधुकश्या उजेडात लाज पसरलेली गाली नेहमी बडबडणारी तू शांत तेंव्हा होतीस चोरट्या तिरक्या नजरेने पहात तू हसलीस कळलं नाही मला तू कधी माझी झालीस सुर्य गेला क्षितिजाआड कि पाठ तुझी फिरायची पण त्या दिवशी नव्हती घाई तुला जाण्याची क्षितिजाचे ते रंग न्याहाळत तू राहिलीस गुढ वेगळ्या विचारात होती तू हरवलीस कळलं नाही मला तू कधी माझी झालीस बावरलेली तुझी नजर नव्हती माझ्याकडे वळली मनातली तुझ्या चलबिचल होती ग मला कळली माझ्य...